डॉ. दयानंद भाऊराव जाधव यांना औरंगाबाद विद्यापीठामार्फत पी. एच. डी. पदवी प्राप्त
उदगीर:-करवंदी , ता. उदगीर , येथील डॉ. दयानंद भाऊराव जाधव यांना , इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषयातील सर्वोच्च पी. एच. डी. पदवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद मार्फत प्राप्त झाली आहे .
डॉ. दयानंद जाधव यांनी “ग्रीन सिंथेसीस ऑफ मेटल ऑक्साईड फॉर एप्लिकेशन्स इन नॅनो इलेक्ट्रॉनिक्स” या विषयावर आपला शोधनिबंध पुण्याचे नामांकित सी. ओ. ई.पी. कॉलेज चे प्राध्यापक डॉ. आर. डी. कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केला होता. हे शोधकार्य त्यांनी भारतातील नामांकित संस्था आय. आय. टी. मुंबई या ठिकाणी आय. एन. यू. पी. कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण केले होते. शोधनिबंध साठी पंच म्हणून व्ही. आय. टी. वडाळा,मुंबई येथील डॉ. संगीता एम. जोशी आणि गुलबर्गा विद्यापीठातील डॉ. आर. एल. रायबागकर यांची निवड करण्यात आली होती, यांनी औरंगाबाद विद्यापीठातील उप कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांचा सत्कार एम. जी. एम. संस्थेचे अध्यक्ष श्री. कमलकिशोर कदम , संचालिका डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. सायगावी , विभागप्रमुख नरवाडे, आदींनी केले.
डॉ. दयानंद जाधव हे करवंदी येथील विद्यमान महिला सरपंच कौशल्या भाऊराव जाधव यांचे सुपुत्र आहेत.