तुमचं आमचं नातं काय…. जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात
निलंगा : (प्रतिनिधी)राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२५ वी जयंती मराठा सेवा संघ निलंगा शाखेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित बांधवांनी ‘तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय… ‘जय जिजाऊ जय शिवराय’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे, सचिव इंजि. मोहन घोरपडे, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, शहराध्यक्ष माने, नितीन जाधव, डॉ उद्धव जाधव, डॉ. सचिन बसुदे, डॉ. नितीश लंबे, डॉ. श्रीपती सूर्यवंशी, सुबोध नलमले, आर. के. नेलवाडे, प्रकाश सगरे, अंबादास जाधव, डी. एन. बरमदे, सुधीर पाटील, अॅड. तिरुपती शिंदे, सचिन नाईकवाडे, दत्तात्रय बाबळसुरे, आनंद जाधव, पवार आदी उपस्थित होते. , संभाजी चांदूरे, भास्कर सोळुके, सुनील टोम्पे, सहदेव नाना आकडे, प्रताप हंगरगे, प्रशांत गाडीवान, महेश पुरी, सचिन पुरवत, बंटी देशमुख, हंसराज शिंदे, किरण घुमाळ, कुलदीप सूर्यवंशी, महेश जाधव, डी. जी. शिंदे, भास्कर यादव, विकास पवार आदी उपस्थित होते