महाराष्ट्र महाविद्यालयात जिजाऊ- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालय राष्ट्रिय सेवा योजना विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या जयंतीदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व विधिज्ञ सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर, निलंगा येथील न्यायाधीश मा. ए.एस.मुंडे हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन तरीत्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहीजे. युवा दिनाच्या अनूषंगाने बोलत असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरीत्रातील अनेक घटना प्रसंग सांगून त्यांचे कार्य आजही युवकांना मार्गदर्शक असल्याचे मत प्रतीपादन केले. यावेळी ऍडव्होकेट नारायण सोमवंशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या महान व्यक्तींच्या चरीत्रातून प्रेरणा घेऊन मोठी ध्येये समोर ठेवली पाहीजेत व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट अलमले, ऍडव्होकेट शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. अनिल सिंगारे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. माधव कोलपूके यांनी या जयंतीदिना निमित्त जिजाऊ व विवेकानंदांचे चरीत्र विद्यार्थ्यांनी वाचले पाहीजेत. हीच चरीत्र आपल्याला मार्ग दाखवत असतात असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ.. ज्ञानेश्वर चौधरी,डॉ. धनंजय जाधव, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. अरूण धालगडे, डॉ. हंसराज भोसले, डॉ. अजीत मुळजकर, डॉ. भास्कर गायकवाड श्री पवन पाटील, श्री सुहास माने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले, संचलन कु. प्राजक्ता पांचाळ हिने केले तर आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री ऊमाजी तोरकड, श्री सचीन महींद्रकर स्वयंसेवक विष्णू मुळे यांनी विशेष परीश्रम घेतले.