राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पंडित धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती
निलंगा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा कौल दिल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व युवक कांग्रेस पदाधिकारी थेट जनतेशी संपर्क साधून पक्षाची बांधणी करत असताना पहायला मिळत आहेत.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदा, पंचायत समित्या,जिल्हा परिषदेत जास्तीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कसं फडकवता येईल यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निलंगा येथे लाल बहादूर शास्त्री येथे पंडितराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संघटन बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला नूतन युवक लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा व त्यांच्या सोबत आलेल्या टीमचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष वकील इनामदार, औसा शहराध्यक्ष अविनाश टिके आणि तालुका अध्यक्ष दिलीपदादा पाटील,युवक शहर अध्यक्ष धम्मानंद काळे, तालुका कार्याध्यक्ष महेश चव्हाण,शहर महिला तालुका अध्यक्ष पानफुल पाटील,महिला शहर अध्यक्ष मोमिन ताई,अंगद जाधव,प्रवीण कवटकर, महेश मसलगे,संजय सावकार, गुणवंतराव जाधव, सलीम पठाण, रवी पाटील,रोहित पाटील, औराद शहराध्यक्ष सिद्दीक मुल्ला,अशोक शिरवाटे, हरिदास साळुंके, राम सगर,इफरोज शेख, निजाम शेख, किरण साळुंके, सचिन दोडके, मुस्ताक बागवान, नामदेव बिराजदार, जहांगीरभाई, विनोद शेवाळे, निलेश गायकवाड, मुन्ना सुरवसे, गौतम सुरवसे,सतिश डांगे, विकास ढेरे, संदीप मोरखंडे, सतीश कांबळे,इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.