शिंदीजवळग्याच्या सरपंच पदी भारतबाई सुरवसे,
उपसरपंच पदी रमेश सिरसले यांची बिनविरोध निवड
निलंगा- शिंदीजवळग्याच्या सरपंच पदी भारतबाई पंडितराव सुरवसे तर उपसरपंच पदी रमेश माधवराव सिरसले यांची बिनविरोध निवडनिवड करण्यात आली. सदस्यपदी शारदा राजेंद्र सुरवसे, माधव केरबा घोलप, जैनाबि नजीर शेख,बळवंत दादाराव धुमाळ, भारतबाई सोपान सुरवसे, महादेवी गुणवंत कांबळे,किसन माधव मगर, गोकर्णा माधव सिरसले निवड करण्यात आली. या निवडीवेळी अनिल शेळके (मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी निलंगा ),एन.व्ही.गायकवाड (ग्रामसेवक, शिंदीजवळगा )अनंत मामाळे,राम भीमराव धुमाळ,दयानंद बळवंत धुमाळ,माधव अंगद सिरसाले,शिवाजी माधवराव सुर्वयंशी(पोलीस पाटील ),विरभद्र राजेंद्र सुरवसे,नामदेव महाराज सिरसले व गावातील नागरिक उपस्थित होते. या निवडीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने,शिवसेनेचे निलंगा विधानसभेचे नेतृत्व तथा समाजसेवक लिंबन महाराज रेशमे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, हरिभाऊ सगरे,मा. कृषी सभापती बजरंग दादा जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वंजारवाडे, महिला आघाडी तालुका संघटिका रेखाताई पुजारी, शहरप्रमुख दैवता सगर इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.