माजी मंञी आ.निलंगेकर यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यास तीनचाकी ऑटो वाटप
लातूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के विशेष निधीतून दिव्यांग लाभार्थ्याला व्हेडींग स्टाॕल (तीनचाकी अॕटो) माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील गंगाधर रावसाहेब देशमुख या दिव्यांग लाभार्थ्याला लातूर जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सन ०२१-२२ या वर्षात मंजूर झालेल्या विशेष ५ टक्के निधीच्या माध्यमातून शंभर टक्के लाभाच्या तत्वावर रोजगार उपलब्ध व्हा यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या या योजनेतून गरीब दिव्यांग लाभार्थी बांधव याना रोजगार उपलब्ध व्हावा व ते स्वाभिमानी जीवन जगावे हा हेतू ठेवून अंबुलगा बु येथील ४० टक्केपेक्षा कमी दिव्यांग असलेले गंगाधर देशमुख या लाभार्थ्यास व्हेडींग स्टाॕल (तीनचाकी अॕटो दिनांक ७ रोजी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी चेअरमन दगडू सोळुंके,माजी नगरसेवक डॉ किरण बाहेती,रामभाऊ काळगे,बालाजी मोरे ,झटींग म्हेञे,ज्ञानेश्वर बरमदे यासह अनेकजन उपस्थित होते.