बंदुका व शस्त्रे पाहून विद्यार्थी भारावले
एमडीए शैक्षणिक संकुलात रेझिंग डे निमित्त शस्त्र प्रदर्शन
लातूर/प्रतिनिधी:रेझिंग डे निमित्त विवेकानंद चौक पोलीस ठाणे व एमडीए फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोळपा येथे एमडीए शैक्षणिक संकुलात पोलीस दलातील शस्त्र प्रदर्शन व कायदा-सुव्यवस्था मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.या प्रदर्शनात पोलिसांकडे असणारी शस्त्र जवळून पाहता आल्याने विद्यार्थी भारावून गेले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे,सावंत,पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे,गणोरकर,अवेज काझी,श्रीमती अनिता अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
नलिनी गावडे,सरपंच सिद्धेश्वर शिरगिरे,पत्रकार विजयकुमार स्वामी,पद्माकर सुरवसे,कवायत निर्देशक महेश भारती,वसीम सय्यद,वहीदोद्दीन शेख,पांडुरंग कोकणे,संतोष नारळे यांच्यासह संस्थेचे संचालक दिनेश आंबेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रामास्वामी,प्राचार्य डॉ.संजय क्षिरसागर व रवी कुऱ्हाडे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कवायत निर्देशक महेश भारती व वसीम सय्यद यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती दिली.शस्त्रांची नावे,
त्यांची मारक क्षमता तसेच ही शस्त्रे किती घातक आहेत ? हे देखील त्यांनी सांगितले.कायदा व सुव्यवस्था या संदर्भात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलिनी गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.उपनिरीक्षक अवेज काझी यांनीही विद्यार्थीदशेत वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे असते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शांततेचे प्रतीक असणारी कबुतरे हवेत सोडण्यात आली.पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनीही त्यांना सलामी दिली.या कार्यक्रमास संस्थेतील प्राध्यापक,शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.