05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
मतदानासाठी शिक्षकांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा
लातूर, (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवार, 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मतदार शिक्षकांना आपला हक्क बजाविण्यासाठी मतदानादिवशी एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार एक दिवसाची विशेष नैमित्तक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा शिक्षकांना अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, अशी माहिती लातूर जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.