• Tue. Apr 29th, 2025

राज ठाकरे यांना परळी कोर्टाचे समन्स: 12 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Byjantaadmin

Jan 2, 2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी कोर्टाने समन्स बजावले आहेत. त्यांना येत्या 12 जानेवारी रोजी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांना सुनाणीसाठी बोलावण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

राज ठाकरे यांना 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाली होती. या अटकेचे राज्यभर पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परळी तालुक्यात अनेक ठिकाणी तोडफोड केली. परळी-गंगाखेळ रोडवरच्या धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करून तोडफोड केली. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यात आली होती.

सुनावणीसाठी मारली दांडी

राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर 10 फेब्रुवारी2022 पर्यंत परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, याविरोधात संजय आघाव, शिवदास बिडगर, अनीस बेग, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांनी कोर्टात धाव घेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज यांना 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले. आता पुन्हा 12 जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed