• Tue. Apr 29th, 2025

सोलापुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.. लातूर चे पत्रकार मुस्लिम कबीर सह 12 पत्रकारांचा दर्पण दिनी होणार सन्मान …

Byjantaadmin

Jan 2, 2023

सोलापुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर..
लातूर चे पत्रकार मुस्लिम कबीर सह 12 पत्रकारांचा दर्पण दिनी होणार सन्मान …
सोलापूर- सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी २०२३ ला आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान कार्यक्रम व माजी जिल्हा माहिती अधिकारी तसेच उर्दू पत्रकारितेला दोनशेवर्ष पूर्ण झाल्या बदल उर्दू वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा सन्मान ही केला जाणार आहे, अशी माहिती सचिव प्रा.पी.पी. कुलकर्णी यांनी दिली
हे कार्यक्रम शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ सकाळी ११ वाजता पत्रकार भवन विजयपुर रोड येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असून पुरस्कार वितरण पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मठपती असणार तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर हे उपस्थित राहणार आहेत.
यंदाचे आदर्श पत्रकार पुरस्कार पुढीलप्रमाणे संचारकार स्व. रंगा अण्णा वैद्य स्मरणार्थ आदर्श पत्रकार पुरस्कार २०२३ ज्येष्ठर मुक्त पत्रकार पांडूरंग संगा यांना तर “कासिदकार” स्व. अ. लतीफ नल्लामंदू स्मरणार्थ आदर्श पत्रकार पुरस्कार २०२ ३ संपादक सायं. दैनिक सांज सोलापूर बातमीदार अविनाश सीताराम कुलकर्णी आणि स्व. बाबूराव मठपती स्मरणार्थ आदर्श पत्रकार पुरस्कार २०२३ दै. पुण्यनगरी उपसंपादक शरीफ  सय्यद यांना जाहिर करण्यात आले आहेत.
तसेच पत्रकार दिनानिमित्त माजी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्र्य वामनराव जोशी, यु. आ. सिद्दीकी, प्रमोद गवळी, अंबादास म्याकल आणि उर्दू पत्रकारितेला दोनशे वर्ष झाल्याने ज्येष्ठ पत्रकार लेखक मुस्लीम कबीर, नदीम मिर्जा, अर्शद सिदीकी, अजहर फाजील, सुलतान अखतर, इक्बाल बागबान, गुलाम साकीब, चाँद अकबर, आसीफ जुनैदी यांचा ‘उर्दू पत्रकारितेचे वारसदार’ हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे ,असे आवाहन सचिव पी. पी. कुलकर्णी, सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील उर्दुचे नामवंत पत्रकार , कवी व लेखक म. मुस्लिम कबीर यांचे उर्दू पत्रकारिता मधील योगदान ची दखल सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने घेवून त्यांचा पुरस्कार देवुन सन्मान करीत आहे. मुस्लिम कबीर हे अनेक उर्दू वर्तमानत्राद्वारे सामाजिक, शैक्षणिक बातम्या व विचार मांडतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही त्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला तर विविध सामाजिक , शैक्षणिक संघटनांनी त्यांना पुरस्कार देवून गौरविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed