कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमा रकमेचे धनादेश वितरीत
लातूर, दि. 28 (जिमाका) : कोविड-19 च्या काळात आपले कर्तव्य बजाविताना मृत्यू झालेल्या उदगीर नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते आज विमा रकमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.
नगरपरिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यावेळी उपस्थित होते.
कोविड-19 मुळे मरण पावलेले उदगीर नगरपरिषदेचे कर्मचारी अजय बाबुराव सुतार यांच्या पत्नी श्रीमती धम्मदिना अजय सुतार यांनी, तसेच दुसरे मयत कर्मचारी बालाजी तांबोळी श्रीमती जानकबाई बालाजी तांबोळी यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून विमा रकमेचे प्रत्येकी पन्नास लक्ष रुपये रकमेचे धनादेश स्वीकारले.