NSUI (विद्यार्थी काँग्रेस) लातूर जिल्हा निरीक्षक श्रीमती राधिकाजी देशमुख यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी— NSUI लातूर जिल्हा निरीक्षक श्रीमती राधिकाजी देशमुख यांचा लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर येथे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास लातूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, तसेच NSUI लातूर जिल्हाअध्यक्ष रामराजे काळे, NSUI राज्य समन्वयक रोहित बिराजदार,NSUI जिल्हाउपाध्यक्ष अँड. उज्वल बडगे, NSUI जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कमलेश वारद व महेश साळुंके, प्रशांत रेड्डी व NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी विद्यार्थी संघटना अधिक मजबूत व प्रभावी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.दौर्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, प्रयागबाई पाटील कॉलेज, व्हिडिएफ कॉलेज व राजमुद्रा अकॅडमी या शिक्षणसंस्थांना भेटी दिल्या. दुपारी नियोजित बैठकीदरम्यान विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.भेटीवेळी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर यांनी श्रीमती राधिकाजी देशमुख यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
