• Tue. Oct 14th, 2025

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा यासाठी शिवसेनेचं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Byjantaadmin

Oct 8, 2025

लातूर:- अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सरसकट पीकविमा मिळावा, यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनप्रसंगी शिवसेना राज्य समन्वयक मा. आमदार डॉ. राजनजी साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, शिवाजीराव माने, ब्रम्हाजी केंद्रे, तालुकाप्रमुख बाबुरावजी शेळके, कोंडीरामजी काळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जयश्रीताई भुतेकर, अर्चनाताई बिराजदार,

महिला उपजिल्हाप्रमुख दिशाताई देशमुख, महानगरप्रमुख प्रगतीताई डोळसे, महिला शहरप्रमुख गाडेकरताई, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीपजी सूर्यवंशी, विजयजी कसपटे, युवराजजी वंजारे, युवासेना लोकसभा अध्यक्ष कृष्णाजी सरवदे, मोहनजी दिवटे, आकाशजी बजाज, यशवंत कदम, भगवान शिंदे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आर्थिक मदतीचा नसून त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ न घालवता, सर्व शेतकऱ्यांना पीकविमा योजना अंतर्गत लाभ मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली.लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा यासाठी शिवसेनेचं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *