• Wed. Oct 15th, 2025

महायुती सरकारची शब्दपूर्ती; अतिवृष्टीबाधितांना समाधानकारक मदत भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांनी मानले सरकारचे आभार

Byjantaadmin

Oct 8, 2025

महायुती सरकारची शब्दपूर्ती; अतिवृष्टीबाधितांना समाधानकारक मदत भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांनी मानले सरकारचे आभार

लातूर ( प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीबाधितांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने समाधानकारक मदत देण्याचा शब्द दिला होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटीचे मदत पॅकेज जाहीर केली आहे. हे पॅकेज जाहीर करून महायुती सरकारने शब्दपूर्ती केली असून अतिवृष्टीबाधितांना समाधानकारक मदत केल्याचे सांगून लातूर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले आहेत. 

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने शेती पिकासह शेत जमिनींचे मोठे नुकसान होऊन अनेकांच्या जमिनी खरडून व वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर पूरस्थितीने नागरिकांच्या घरांचे व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झालेले होते. अनेकांचे पशुधन मयत झाले तर वाहून सुद्धा गेले आहेत. अतिवृष्टीच्या हाहाकारने शेतकरी व नागरिक हवालदिल झाले होते. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात अपेक्षित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार याने सातत्याने या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. या प्रसंगी तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. महायुती सरकारने लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा शब्द दिला होता. सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम करणाऱ्या महायुती सरकारने संवेदनशीलपणा दाखवत शब्दपूर्ती करून अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटीचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेज केवळ आपल्यापुरते जाहीर न करता त्याची प्रत्यक्षात याची अंमलबजावणी सुद्धा करण्यास सुरुवात केले असल्याचे सांगून लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मदत पॅकेज जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे व महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहे.

महायुती सरकारची भूमिका शेतकऱ्यांना मोठी आधार देणारी असून अतिवृष्टीबाधितांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांना दिलासा देण्याचे काम केले असल्याचे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. या मदतीच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था पुन्हा उभा राहण्यासाठी मोठी मदत होणार असून शेतकरी व नागरिकांना या मुळे नवसंजीवनी सुद्धा मिळणार आहे. महसूल वसुली, कर्ज पूनर्गठन व परीक्षा शुल्क माफ अशा अनेक निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. सदर मदत मिळण्यास कोणती अडचण आल्यास किवा मदतीपासून वंचित राहत असल्यास त्यांनी भाजप शहर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवहान भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *