महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, निलंगा ला उत्कृष्ट मानांकन
निलंगा (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, निलंगा यास उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे. हे श्रेणीकरण पुढील दोन वर्षे लागू राहणार आहे.संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर यांचे मार्गदर्शन आणि प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांचे नेतृत्व या यशामागे महत्त्वाचे ठरले. २०१२ पासून दरवर्षी उत्कृष्टतेची परंपरा कायम राखणारे हे अग्रगण्य फार्मसी महाविद्यालय आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे योगदान लक्षणीय आहे. डॉ. चंद्रकांत ठाकरे, प्रा. अविनाश मूळडकर, डॉ. संजय दूधमल, प्रा. विलास कारभारी, डॉ. अमोल घोडके, प्रा. राजश्री मोरे, प्रा. सलमा काद्री, नामदेव माने, मनीषा आवळे, रमाकांत मांदळे, गणेश पवार, राजू चोपने, शिवाजी भालेकर आणि ज्योती वाघमारे यांनी अध्यापन, संशोधन व विविध उपक्रमांत मोलाची भूमिका बजावली आहे.
संस्थेकडे अत्याधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध वाचनालय, रुग्ण सल्ला केंद्र, आरोग्य जनजागृती मोहिमा, कार्यशाळा, सेमिनार आणि उद्योगभेटी यांसारखी सुविधा आहेत. Pharma Connect या उपक्रमातून फार्माकोव्हिजिलन्सवरील पोस्टर स्पर्धा, रक्तदान शिबिर, उद्योजकता व नेतृत्व सेमिनार, माजी विद्यार्थी मेळावे, उद्योगतज्ज्ञ व्याख्याने, राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबीन क्लब, हॅकॅथॉन, रुग्ण सल्ला मोहिमा व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात.या सर्व कृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित झाले आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधील सातत्यपूर्ण यश आणि सलग उत्कृष्ट मानांकन हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ओळख ठरली आहे.
