लातुर : नुकतेच एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर यांना महाराष्ट्र शासनामार्फत तीन पुरस्कार प्राप्त झाले असुन सदर पुरस्कार हे पुणे येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
या मध्ये मुख्यतः बेस्ट ग्रीन क्लब समन्वयक म्हणून प्रा. आर. पी. राजपुत, सर्वोत्तम पोस्टर प्रदर्शनासाठी कु. श्वेता किशोर भडके व मार्गदर्शक प्रा आर.पी. राजपुत तसेच सर्वोत्तम ग्रीन क्लब म्हणून एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातुर असे तब्बल तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सदर पुरस्कार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर, युनिसेफचे मार्गदर्शक श्री युसुफ कबीर तसेच विभागीय सहसंचालक डॉ व्ही व्ही जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष श्री माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव श्री माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव श्री सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष श्री विजय रेवडकर, कार्यकारी संचालक श्री प्रदीप दिंडेगावे, संचालक श्री राजेश्वर बुके, श्री बस्वराज एरटे, श्री काशिनाथ साखरे, सौ. ललिताताई पांढरे, श्री बाबुराव तरगुडे, परिसर संचालक डॉ मोहन बुके, प्राचार्य डॉ एस एम जगदे, उपप्राचार्य प्रा विरभद्र बाळे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फ अभिनंदन करण्यात आले आहे.

