• Thu. Feb 5th, 2026

डॉ. के डी शेंडगे इंग्लिश मिडियम शाळेत दांडिया महोत्सव

Byjantaadmin

Oct 1, 2025

इंग्लिश मिडियम शाळेत दांडिया महोत्सव उत्साहात

उमरगा (प्रतिनिधी):- येथील डॉ. के डी शेंडगे इंग्लिश मिडियम शाळेत दांडिया महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये लहान मुलांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला.या महोत्सवांतर्गत डान्स स्पर्धा, ड्रेसिंग, दांडिया अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.विशेषतः ड्रेसिंग व डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकृती व नृत्य सादर केले. या स्पर्धेत काशिफा सोहेल सौदागर यांनी पहिला क्रमांक मिळवला काशिफा सोहेल सौदागरयाला प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उमरगा तील समाजसेविका शिवाई किरण गायकवाड, मलशेट्टी मुख्यदापक उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संस्थापक, प्राचार्य व शिक्षकवर्ग यांचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *