• Thu. Oct 16th, 2025

साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”*

Byjantaadmin

Sep 30, 2025

साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”*

बोरिवली (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या आनंददायी बातमीला ३ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून गेली २२ वर्ष सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या, आरती आर्ट अकादमी (मुंबई) या संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे येथील (नाटककार मा. जयवंत दळवी लघु नाट्यगृहामध्ये) “जागर अभिजात मराठीचा”  या साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा अंतर्भाव असलेल्या, अनेक मान्यवर कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.दुपारी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता सादर होणाऱ्या या विविधरंगी आणि विविधढंगी कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून मराठी भाषेसाठी जागर करावा अशी विनंती संस्थेचे विश्वस्त-अध्यक्ष रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी केली आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे जागर अभिजात मराठीचा 

शुक्र. ३ ऑक्टोबर २०२५ प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह)बोरिवली 

दुपारी ४ वाजता आणि रात्रौ ८ वाजता. प्रवेशिका प्रत्येक सत्रासाठी रुपये २५०/- दोन्ही सत्रांसाठी रुपये ४००/- संपर्क: ९९६९१६५१०१

*दुपारी ४ वाजता* 

!! ईशस्तवन !! सादरकर्त्या:

निमिषा वालावलकर

!! नाट्यसंगीत !!

गायक :सौरभ वखारे आणि अबोली गद्रे रानडे, वादक : केदार भागवत व आदित्य पानवलकर 

!! मराठी भाषा वाचन स्पर्धा !! अंतिम फेरी- परीक्षक: संभाजी सावंत आणि तपस्या नेवे

*रात्रौ ८ वाजता*

!! भारत माता वंदना !! सादरकर्त्या: तेजश्री अडिगे (नृत्यकला मंदिर, पुणे)

!! लावणी नृत्य !! सादरकर्त्या: कल्पिता राणे

एकांकिका !!आख्यान ए झुरळ!!

सादरकरते: सी के ठाकूर महाविद्यालय (पनवेल)

!!कलाकार संगीत खुर्ची !! 

सहभाग – गिरीश ओक, अविनाश नारकर, अनिकेत विश्वासराव, अमोल बावडेकर, उपेंद्र दाते, प्रमोद शेलार आणि प्रदीप कबरे

विशेष आभार 

गणेश जगताप 

अभिजीत झुंजारराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *