निलंगा नगरपरिषद कायमसेवकाची सहकारी पत संस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
निलंगा (janta express ) प्रतिनिधी निलंगा नगर परिषदेच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा दिनांक 28 /9 /2025 रोजी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहामध्ये पार पडली. सदरील सभेमध्ये दि. 31/3/25 या दिनांक च्या ताळेबंदाचे तसेच या दिनांकास संपणाऱ्या वर्षात नफा तोटा पत्रकाचे लेखापरीक्षण झाल्यामुळे त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या नफा तोटा व व्याज या बद्दलची सर्व माहिती सभागृहास देण्यात आली. तसेच थकबाकीदाराची वसुली करण्याकरिता सर्व संचालक मंडळांनी मदत करावी तसेच या चालू वर्षांमध्ये सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचे सदरील सभेमध्ये ठरवण्यात आले. सर्वसाधारण सभेची सुरुवात झाल्यानंतर पतसंस्थेविषयीची सर्व माहिती पतसंस्थेचे चेअरमन प्रेमनाथ गायकवाड यांनी सभागृहास दिली तसेच सचिव रमेश कांबळे यांनी पतसंस्थेतील वेळेवर कर्जाची परतफेड केल्यानंतर आपणाला व संस्थेला फायदा होईल याविषयीची माहिती दिली .या सर्वसाधारण सभेस विक्रम शिंदे, सचिन कांबळे ,राजेश जाधव ,गोपाळ सोळुंके ,सुमनबाई सूर्यवंशी इत्यादी संचालक उपस्थित होते तसेच या सर्वसाधारण सभेला पत संस्थेचे सभासदानी उपस्थिती नोंदवून सभा यशस्वी केल्याबद्दल संचालक मंडळ व सर्व सभासदांचे आभार पेटकर तुकाराम यांनी मानले.
