• Thu. Oct 16th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून हरंगुळ (खु) येथील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी; तात्काळ मदत

Byjantaadmin

Sep 30, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून हरंगुळ (खु) येथील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी; तात्काळ मदत देण्याच्या सूचना
लातूर प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज,
मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील हरंगुळ (खुर्द) येथे अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी केली.
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी
शेतकरी शरद संभाजी पवार यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली
आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधला. पंचनामे पूर्ण करून तात्काळ मदत
देण्याच्या सूचना: आमदार देशमुख यांनी यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित
प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून, पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईची मदत देण्याच्या सूचना
केल्या.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती- जगदीश बावणे,
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- अभय साळुंके, नायब तहसीलदार- सुधीर
कांबळे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, सहाय्यक
गटविकास अधिकारी सतीश चोरमले, उपकृषी अधिकारी श्री.सोळंके, मंडळ कृषी
अधिकारी अण्णाराव वाघमारे, कृषी सहाय्यक यु.डी.चव्हाण, ट्वेंटीवन शुगरचे
व्हा. चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषद शाखा अभियंता- प्रिया पाटील,
आनंद पवार, मनोहर लिंबाजी झुंजे पाटील, भीमाशंकर झुंजारे, उमाकांत भुजबळ,
राम स्वामी, धनराज पाटील, श्याम बरूरे, मंडळ अधिकारी रामराव झाडे, तलाठी
बालाजी राठोड, राजकुमार झुंजे पाटील, सोमनाथ झुंजे पाटील आदिसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *