दोन समाजामध्ये व्देषभाव निर्माण करण्याचे उद्देशाने फेसबुकवरुन व्हिडीओ व्हायरल करण्याऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद.

लातुर शहरामध्ये दिनांक 24/09/2025 रोजी कानपुर उत्तरप्रदेश येथील घटनेसंदर्भात लातुर शहरात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चावरुन हिंदु व मुस्लीम समाजामध्ये व्देषभाव निर्माण करण्याचे उद्देशाने फेसबुक सोशल मिडीयाद्वारे अफवा पसविणारा खोटा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पो.स्टे. विवेकांनद चौक लातुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालु आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित करून दोन गटामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश लातूरचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी सर्व ठाणेदारांना दिलेले आहेत.लातुर जिल्ह्यामध्ये दोन समाजात व्देषभावना निर्माण करण्याचे उद्देशाने अथवा त्यांच्या भावना भडकावण्याचे उद्देशाने कोणताही इसम सोशल मिडीयाद्वारे पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारित करील त्याचेविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तसेच अशा प्रकारचे कोणी सोशल मिडीयाद्वारे पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारित करित असल्यास संबधीत पोलीस स्टेशन अथवा सायबर सेल लातुर येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समिरसिंह साळवे यांनी केले आहे.