• Thu. Oct 16th, 2025

सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण कारभारातून विलास बँक सामान्याच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवेल-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Sep 30, 2025

सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण कारभारातून विलास बँक सामान्याच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवेल-
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख


सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

होतकरू तरुणांना पतपुरवठा करून त्यांना उद्योजक व्यावसायिक बनवण्यासाठी पुढाकार घेण्यात
येईल असे सांगीतले. यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले या बँकेने लातूर नंतर आता धाराशिव,
परभणी, नांदेड या जिल्ह्यात ही शाखा सुरू केल्या आहेत. आगामी काळात छत्रपती संभाजीनगर,
पुणे, मुंबई अशा ठिकाणी शाखा सुरू करून बँकेचा विस्तार केला जाईल. जेथे लातूरचा माणूस
मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे, तेथे बँकेची शाखा सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल
असेही यावेळी सांगितले. यावर्षी अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी
आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे या सर्वांना आधार देण्याचे काम शासनाने करायला हवे,
असेही यावेळी बोलतांना आमदार देशमुख यांनी म्हटले.
सामान्य माणसाला मदत करण्याचा विषय आला की पैशाचे सोंग करता येत नाही अशी
वक्तव्य सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती करताना दिसत आहेत, ही वक्तव्य या परिस्थितीत
संयुक्तिक नसल्याचे सांगून कोणीही मागणी केलेली नसताना बुलेट ट्रेन आणि शक्तिपीठ सारख्या
प्रकल्पावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी असलेल्या विद्यमान सरकारने अडचणीत
सापडलेल्या जनतेला सढळ हाताने मदत करावी अशी जाहीर मागणीही याप्रसंगी आमदार देशमुख
यांनी केली.

सभासदांना ८ टक्के लाभांश कर्मचाऱ्यांना ८.३३ % बोनस

विलास को-ऑपरेटिव बँक नफ्यात चालत असल्यामुळे यावर्षी सभासदांना ८ टक्के लाभांश
दिला जाईल त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता त्यांनाही ८.३३ % बोनस देण्यात
येईल असे यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी जाहीर केले.
सभेत प्रस्तावीक करतांना चेअरमन किरण जाधव म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील नव्हे
तर मराठवाड्यातील सहकारी बँकांच्या क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या विलास बँकेच्या कामकाजाचा
शुभारंभ मे २००३ पासून झाला. बँक स्थापनेपासून आजपर्यंत बेरोजगार युवक, व्यापारी, उद्योजक
व शेती पूरक व्यवसायिक सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टीने बँकेने धोरण राबविले
आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे विचार आणि सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी
देशमुख यांची प्रेरणा व संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली व माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची गेल्या
२४ वर्षाची वाटचाल बँकासाठी पथदर्शी राहिलेली आहे, असे सांगून सभासद व भाग भांडवल,
राखीव व इतर निधी, ठेवी, ठेवीवरील विमा, कर्जे, अग्रक्रम व दुर्बल घटकांना दिलेले कर्जे,
गुंतवणूक, कर्ज वसुली/एनपीए, ऑडिट वर्ग, आदिची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त
केले. विलास बॅक अधिमंडळाच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी आदरणीय
विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पन करुन दिपप्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरूवात
करण्यात आली. अहवाल वाचन ॲड. किरण जाधव यांनी केले, विषय पत्रीका वाचन कार्यकारी
संचालक जितेंद्र सपाटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पुंड यांनी केले तर शेवटी
आभार समद पटेल यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *