शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केली अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी
निलंगा (प्रतिनिधी):- शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील, शिरूरानंतपाळ सह परीसरातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जात व्यथा जाणून घेतल्या .., शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शीअनंतपाळ निटूर, मुगाव, वंजारवाडा, शेंद शी अनंतपाळ तालुक्यातील ढोबळे वाडी उजेड सय्यद अंकुलगा डोंगरगाव सह शिवारातील पीक नुकसानीचे पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला अतिवृष्टी आणि ढगफुटीत सदस्य पावसाने निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे यामध्ये शेतकर्यांची जनावरे दगावली असून अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याची मोठे नुकसान झाले.असून राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे ऊपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शेतीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्या त्या गावातली समस्या जाणून घेऊन स्थानिक प्रशासनाला मदत व पंचनामे करण्या साठी लातूर जिल्ह्याच्या कलेक्टर वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना फोन करून सध्याची परिस्थिती ऐकवत दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना तात्काळ जनतेच्या मदती साठी ग्राउंड वर येऊन मदत कार्य करण्याचे अहवान केले व स्वतः त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला फोन करून लोकांच्या मदतीसाठी जाण्याच्या सूचना केल्या. डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याचे 19 शेळ्या पाण्यामध्ये वाहून गेल्या एक बैल वाहून गेला याबद्दल संबंधित सूचना करून या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माने साहेब यांनी सूचना केल्या शिरूर अनंतपाळ येथे घरणी नदीच्या विळख्यात सापडलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला केली. शेतकऱ्यावर अतिवृष्टीचं भयान असं संकट आलेल असून या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावरून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना औसा ,निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या चारही तालुक्यासह लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेला आहे . या भागातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकची मदत देण्यासाठी सविस्तर असा अहवाल मांडून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रह करणार आहे असे मत जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी मांडले .
यावेळी एस टी कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव बिरादार, युवा सेना जिल्हाधिकारी युवराज वंजारे, शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, शिवसेना शी अनंतपाळ तालुका प्रमुख विकास शिंदे, लातूर शहर महानगर प्रमुख महेश चांदणे, शहर प्रमुख विनोद धुमाळे,तालुका समनवयक विद्याधर शिंदे, युवा सेना शहर प्रमुख अभिषेक शिरसाट, उप सरपंच भालचंद्र पाटील,महिला आघाडी तालुका प्रमुख अँड वर्षा ताई शिंदे, गायकवाड ताई, रेखाताई पुजारी , दैवताताई सगर, कवी गोविंद श्रीमंगल, दिलीप ढोबळे, मशीन सय्यद, निखिल मोहिते, रमेश मोहिते, शेषेराव पवार, लिंबराज पवार, कुमार मोगरगे, कदम, प्रवीण, मरडे, भुजंग पवार, लिंबराज जलमले शेतकरी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
