मागच्या ४० वर्षात मांजरा परीवाराने लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवण्याची उज्वल परंपरा निर्माण केली-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लातूर प्रतिनिधी;-मागच्या ४० वर्षात मांजरा परीवाराने लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती
घडवण्याची उज्वल परंपरा निर्माण केली आहे. या कार्याचा विस्तार करुन आगामी ४० वर्षाच्या
काळात ही पंरपरा अधिक उज्वल करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास
साखर कारखाना वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलतांना ग्वाही दिली.
सोमवार दि. २९ सप्टेंबर २५ रोजी दुपारी लातूर शहरातील हॉटेल वैष्णव बँकवेट हॉल
येथे विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाचीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव
देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, व्हा. चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे, कार्यकारी
संचालक आबासाहेब पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख,
व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा
शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, लातूर कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, श्री संत शिरोमणी
मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सचिन पाटील, ट्वेंटीवन शुगर
चेअरमन विजय देशमुख, माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी महापौर दिपक सूळ, रेना
सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
माजी अध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी चेअरमन गणपत बाजूळगे आदिसह मांजरा परिवारातील
सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी विलास सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक ऊस
उत्पादक शेतकरी तोडणी, वाहतूक ठेकेदार, कारखाना खाते प्रमुख, सभासद, मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास सहकारी
साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा
दिल्या. त्यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला, तसेच
शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल राज्य सरकारवर तीव्र टीका केली.
मांजरा परिवाराची यशस्वी वाटचाल
माजी मंत्री, आमदार आमदार अमित देशमुख म्हणाले की, आदरणीय विलासराव
देशमुख साहेबांनी सुरू केलेल्या मांजरा शेतकरी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक
सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. मांजरा परिवाराने मागील ४० वर्षांच्या प्रगतीचा
लेखाजोखा घेऊन पुढील ४० वर्षांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मातृसंस्था असलेल्या मांजरा
कारखान्याच्या नेतृत्वाखालील इतर सर्व साखर कारखान्यांची वाटचाल उल्लेखनीय असून, यात
ऊस उत्पादक शेतकरी सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी
सांगीतले.
प्रामाणिक कारभारावर विश्वास
सहकारात प्रामाणिक कारभाराची आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलेली
शिकवण घेऊन आज आपला मांजरा परिवार काम करत आहे. आपल्यावर असलेल्या
विश्वासाच्या बळावरच आजवर अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, असे त्यांनी
नम्रपणे सांगितले.
दोन दशकांत सर्वांगीण विकास झाल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले, दोन दशकात आपण
सर्वांनी मिळून आपल्या संस्थेचा सर्वांगीण विकास केला. आज आपण इथेनॉल, कंप्रेस्ड गॅस
तयार करतो आणि वाहनांसाठी सीबीडी गॅस येणाऱ्या काळात तयार करणार आहोत. ऊसातून
केवळ साखर उत्पादन न ठेवता, अन्य उत्पादन घेत असल्याने ऊसाला चांगला भाव देता
येईल असे माजी मंत्री, आमदार आमदार अमित देशमुख म्हणाले
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर सरकारला फटकारले
यावेळी महाराष्ट्र गीत ऐकले जात असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या वेदना पाहून
अतीव दुःख होत असल्याचे आमदार देशमुख यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, एकट्या लातूर
जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा ३ ते ४ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, तर राज्याचा आकडा
५० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यमान सरकारच्या काळात
भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारी अधिकारी ‘गबाळ मारण्याच्या’ विचारात असल्यासारखे
वाटत आहे आणि सरकार अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत निधीबाबत सकारात्मक असे ठोस
बोलायला तयार नाही. सध्या आपण गेंड्याच्या कातडीचे सरकार पाहत आहोत असे सांगीतले.
नोकरभरती आणि आगामी गाळपाचे नियोजन
उच्च शिक्षण घेऊनही आज रोजगार उपलब्ध नसताना, मांजरा परिवाराने वेगवेगळ्या
पदांवर आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून १८ महिन्यांत १० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे
काम केले आहे. १००% यांत्रिकीकरणासाठी मांजरा परिवाराने पुढाकार घेतला असला तरी,
चांगले काम करणाऱ्या ऊस तोड कामगार व मुकादम टोळ्यांचा रोजगार जाणार नाही, अशी
ग्वाही त्यांनी दिली.
मागील ४० वर्षांत मांजरा परिवाराने जी प्रगती साधली, त्यापेक्षाही अधिक प्रगती,
अधिक विकास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अशीच आर्थिक क्रांती आपल्याला येणाऱ्या
४० वर्षांत करायची आहे, असे सांगून आमदार देशमुख यांनी कारखान्याच्या संचालक व
अधिकाऱ्यांना आगामी गाळप हंगामापूर्वी दसरा ते दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून
त्यांच्या अडचणी आणि रस्ते पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, झोमॅटो प्रमाणे ऊस
तोडणीसाठीसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील ऊस
तोडणीचे वेळोवेळी अपडेट मिळतील.
सध्या आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत
शांत बसणार नाही, वेळप्रसंगी आंदोलन देखील करू, असा शब्द आमदार अमित देशमुख
यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान
झाले आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे हजारो कोटी रुपये आहेत, मात्र शेतकऱ्यांना
मदत द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्रासाठी विशेष मदत
पॅकेजची मी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामा करायला अधिकारी जात
नाहीत, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना रोजगार हमी योजनेतून काम
करून त्यांच्या जमिनी पेरणी योग्य करून द्याव्यात, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या
नियोजनातून १३४ किलोमीटरचे बॅरेज आपल्या लातूर जिल्ह्यात उभे राहिले आहेत, परंतु
सध्या सरकार व अधिकारी गेट दुरुस्ती वेळेवर त्याची करत नाहीत त्यामुळे त्याच्या बॅक
वॉटर मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे हे नुकसान
टाळण्यासाठी यंत्रणा सजग असावी असे सांगीतले.
विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे
म्हणाले की, विलास सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट काम करून ३७
बक्षीस मिळवले आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आमच्या कारखान्याला कर्ज
देण्यासाठी नेहमी मदत केली आहे, असे सांगून संचालक मंडळाचा कार्य अहवाल व विलास
कारखाना व युनिट दोनच्या गाळपाची सविस्तर माहिती उपस्थितांना त्यांनी दिली.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके म्हणाले की, अतिवृष्टीच्या
एवढ्या मोठ्या संकटात शेतकऱ्यांसमोर जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न आहे. माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने सर्कलनिहाय
निरीक्षक अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व मदत करण्यासाठी नेमले आहेत, अतिवृष्टीने
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साडे आठ हजार रुपये देण्याची राज्य सरकारची मदत तुटपुंजी
आहे, त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये पंजाब सरकारने मदत केली तशी करावी असे त्यांनी
सांगितले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव, गोविंद
बोराडे, संभाजी रेड्डी, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, अशोक गोविंदपूरकर,
समद पटेल, अनिल पाटील, संचालक सर्वश्री संचालक सर्वश्री रवींद्र काळे, अमृत जाधव,
सतीष शिंदे (पाटील), अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, गोवर्धन मोरे, रंजीत
पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, हनमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव
साळुंके, दिपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, युनिट एक चे कार्यकारी
संचालक आबासाहेब पाटील,युनिट दोन चे कार्यकारी संचालक आत्माराम पवार आदी उपस्थित
होते. विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची
सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले
तर शेवटी आभार विलास सहकारी साखर कारखान्याचे युनिट दोनचे कार्यकारी संचालक
ए.आर. पवार यांनी मानले प्रारंभी दिपप्रज्वलन करुन मानयवरांनी आदरणीय विलासराव
देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पन करुन अभिवादन केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेत गत गळीत हंगामात सर्वांधीक ऊसउत्पादन करणारे सभासद,
ऊसवाहतुक ठेकेदार, ऊस्तोडणी वाहतुक ठेकेदार, हार्वेस्टर ठेकेदार, मीनी ट्रॅक्टर ठेकेदार यांचा
सत्कार करण्यात आला. बाभळगाव विभागात सर्वांधीक ऊसउत्पादन ६७६.४८४ मे.टन ऊसाचे
उत्पादन घेतल्या बददल चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
