• Thu. Oct 16th, 2025

जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी शिवसेना पदाधिकाऱ्या सह केली अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी

Byjantaadmin

Sep 29, 2025

जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी शिवसेना पदाधिकाऱ्या सह केली अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी..

   औसा (प्रतिनिधी)औसा तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, किणी नवरे, मोगरगा, खरोसा, परिसरा सह शिवारातील पिक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने सह शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, युवासेना जिल्हा अधिकारी विजय कस्पटे सह शिवसेना पदाधिकारी त्या त्या गावातील गावकऱ्या सहअतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने औसा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतातील मुख्य पिक, सोयाबीन फळबाग, भाजीपाला, यांचे झालेले मोठे नुकसान, गुरे ढोर, शेती अवजारे, याचे झालेले नुकसान गावातील घरात पाणी शिरून घरातील अन्न धान्य गृह उपयोगी साहित्याची  शंभर टक्के झालेले नुकसान याची तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, मोगरगा, किणी नवरे, खरोसा, या गावात जाऊन तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत तहसीलदार श्री.घनश्याम अडसूळ साहेब कृषी उप संचालक श्री.दिवेकर साहेब गटविकास अधिकारी श्री.आनंद मिरगणे साहेब तालुका कृषी अधिकारी श्री.दत्तात्रय हाके साहेब यांच्याशी त्या त्या गावातील परिस्थितीवर व तेथील अडचणीवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट शेती वाहून गेलेले, शेती पिकांचे नुकसानीचे, घरात पाणी जाऊन गृह उपयोगी साहित्य, घराची पडझड झालेले शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत राज्य शासनाकडून सर्व निकष बाजूला ठेवून जास्ती जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून बळीराजाला न्याय देण्यासाठी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उप मुख्यमंत्री मा. एकनाथ रावजी शिंदे साहेबांकडे  पाठपुरावा करू निसर्गाच्या भयानक परिस्थित जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यामूळे शेतकऱ्यांनी भयभीत न होता स्थिर राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख शिवाजी राव माने यांनी केले यावेळी बोलत असताना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे म्हणाले की सध्या संपूर्ण राज्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी असे दुहेरी संकट आलेले आहे पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावे राज्य शासन मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्य मंत्री हे राज्यातील सर्व परिस्थिवर बारीक लक्ष ठेऊन आहे राज्याचे उप मुख्यमंत्री शिवसेना नेते मा एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व निकष बाजूला ठेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ जास्ती जास्त मदत जाहीर केल्या प्रमाणे लातूर जिल्ह्यात 244कोटी तर औसा तालुक्या साठी 31कोटी 75लाख 84 हजार रुपयांची तातडीची मदत राज्य शासनाने जाहीर करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर टाकण्याचे आदेश दिले आहेत व प्रशासनाकडून सर्व अतिवृष्टी ग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करा असा आदेश दिलेला आहे त्या मुळे शासना कडून शेतकऱ्यांना जास्ती जास्त मदत मिळून देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी आपल्या पाठीशी भक्कम उभे आहोत आपण घाबरून न जाता धीराने संकटाचा सामना करू असे सांगितले. यावेळी उपस्थित माजी उप सभापती दिनकर मुगळे, नरसिंग मोरे , विजयकुमार यादव, मेहराज पटेल, सतीश येरणुळे,  चंद्रभान जाधव, सुनील सोनवणे, अनिल चांदुरे, दिनकर जाधव, माधव पाटील, जीवन निकम, अनिल सोनवणे, जीवन निकम, शिवाजी हंगरगे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *