
एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा; धनगर समाजाची मागणी…आ. निलंगेकर यांना सकल धनगर समाजाचे निवेदन….
निलंगा : सोमवारी दि. 29 सप्टेंबर रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या संविधानिक देयक असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मार्गी लावून समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना देण्यात आले,
ऑल इंडिया धनगर महासंघ, नई दिल्ली, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या वतीने संस्थापक अध्यक्ष एडवोकेट गुंडेराव बनसोडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाटिंग अण्णा म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील निवेदन देऊन निवेदनासोबत महत्वाचे पुरावे जोडले आहेत. यावेळी भगवान वरवटे, नामदेव काळे, सुग्रीव सूर्यवंशी, रघुनाथ वरवटे, बालाजी म्हेत्रे, बालाजी हुलगुत्ते, सुरेश म्हेत्रे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.