• Thu. Oct 16th, 2025

हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी

Byjantaadmin

Sep 29, 2025

शेतकऱ्यांच्या अडचणीत, संभाजी ब्रिगेड मैदानात….

 आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…..

हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी.

लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यात तसेच संपूर्ण राज्यांमधे मागील काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. सर्व नद्यांना सतत  महापूराचे स्वरूप आले आहे.सगळीकडे हाहाकार झाला आहे.नदीच्या पुरामुळे नंदिकाठचे पीक पूर्णपणे सडलेले आहे. व इतर उभ्या पिकालाच कोंब फुटायला चालू झाले आहे.पुरामुळे कित्तेक शेतकऱ्याचे पशुधन,शेती आवाजारे शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये एक अनेकांचे संसार मोडले अनेकांचा संसार उघड्यावर आला.या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. कोलंमडून पडला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.म्हणून सरकारने तात्काळ शेतकऱ्याच्या संकटकाळात शेतकऱ्याच्या पाठीमागे उभ टाकून शेतकऱ्यांना किमान हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे. 8500 रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्यांची चेष्ठा न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ टाकून भरीव मदत करावी.सद्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं येऊन पाहणी करून गेले खरं पण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून गेले का असं शेतकऱ्यातून चर्चा पहावयास मिळत आहे म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी एक लाख रुपयाची आर्थिक मदत करून याचा संसार उभा करण्यासाठी हातभार लावावा यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा येथील निवासस्थानी निवेदन देऊन मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे. 

मागील अनेक वर्षाचा रेकॉर्ड या पावसाने मोडला असून खरिपाचे पीक हे नासाडी झाली आहे. ऊस आडवे फडून गेले तर तुर पिवळी सोयाबीन उभ्यानेच वापाई चालू झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या पदरात फक्त निराशाच आहे.तसेच आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीची आश्वासन जनतेला दिले होते.मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर आपणास पडला आहे. शेतकरी पूर परिस्थितीतून जात आहे सध्या शेतकऱ्याचा कणा मोडला आहे आणि या मोडलेला कण्याला आधार देण्याचे काम सरकारने करावे.कारण महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत.है वास्तव आहे.

त्यामुळे तात्काळ बळीराजाला आर्थिक मदत करून हातभार लावावे.

महाराष्ट्रात मराठा धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाज बांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तीव्र आहेत सरकारमधील काही आपले प्रतिनिधी व जबाबदार मंत्री या संवेदनशील विषयावर विक्षिप्त विधाने करून वातावरण बिघडवत आहेत जातीतील निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारी हा विषय निकाली काढून असे बेजवाबदार बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तंबी द्यावी. व मराठा ओबीसी व इतर जातीय संघर्ष तीळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ऊसाला सहकारी अथवा खाजगी कारखानदार एफआरपीप्रमाणे सात दिवसात उसाची रक्कम देण्यासाठी पारदर्शक कायदा करावा दुधाला 70 रुपये प्रति लिटर भाव द्यावा व होणारी भेसळ थांबवावी अशा आशियाचे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम,जिल्हा सचिव इर्शाद शेख,सिद्धेश्वर तेलंगे,शहराध्यक्ष परमेश्वर बोधले,रमेश लांबोटे,तालुकाउपाध्यक्ष सगरे गोविंद,तालुका संघटक परमेश्वर जाधव,कुणाल पाटील,भरत चव्हाण,परमेश्वर नांगरे,जावेद मुजावर,गणपतराव वरवटे,ऋषिकेश निलंगेकर,अफरोज पांढरे,हणमंत सगरे,सुभाष सूर्यवंशी,गौस शेख,शिवदास मोरे अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *