माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून कव्हा व चांडेश्वर येथील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी; तात्काळ पंचनाम्याचे निर्देश
लातूर प्रतिनिधी,
महिनाभरापासून लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे
नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी आज, सोमवार, २९ सप्टेंबर २५ रोजी सकाळी लातूर शहर मतदारसंघातील कव्हा
व चांडेश्वर गावास भेट दिली.
शेतकऱ्यांशी संवाद आणि नुकसानीची पाहणी:
कन्हेरी महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या कव्हा आणि चांडेश्वर गावात सोयाबीन, तूर आणि
ऊस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार अमित देशमुख यांनी
कव्हा येथील शेतकरी पांडुरंग देशमुख व अंबादास देशमुख यांच्या शेतात जाऊन सोयाबीन आणि
तूर पिकाची पाहणी केली. तसेच, त्यांनी चांडेश्वर येथील शेतकरी साहेबराव सपाटे यांच्या
शेतातील पिकांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना मदत
करण्याच्या सूचना केल्या.

तात्काळ उपाययोजनांचे निर्देश:
या पाहणीदरम्यान आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरानजीकच्या कातपूर तलावाची
देखील पाहणी केली. तलावाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून,
या संदर्भात तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच त्यांनी प्रभाग क्र. १८ मधील शांतेश्वर नगर येथील रस्त्याची
पाहणी करून, त्याचे काम तात्काळ सुरू करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल पडिले, लातूर शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख,
प्रा.गोविंद घार, नायब तहसीलदार- सतीश कांबळे, उपकृषी अधिकारी-ओमप्रकाश चिंताले, पंचायत
समितीचे विस्तार अधिकारी-श्री.नल्ले, ग्रामपंचायत अधिकारी- सचिन कसबे,मंडळ कृषी अधिकारी
आर.आर.येवले, कृषी सहाय्यक सचिन पडंगे, जिल्हा परिषद शाखा अभियंता के. एन. खरोळकर,
सुदाम रूकमे, सुंदर पाटील कव्हेकर, उपसरपंच-किशोर घार, सिकंदर पटेल, गोविंद सोंदले, राम
स्वामी, चंद्रकांत नलावडे, राजाभाऊ मोरे, जयहिंद पूरी, सुबुद्दीन शेख, महेश नलवडे जीवन
गुंजरगे,डॉ.सतीश कानडे,रमेश थोरमोठे पाटील आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,
कार्यकर्ते,कव्हा व चांडेश्वरचे ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.