निलंगा;- औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा येथील सेवा योजना चे स्वयंसेवक यांच्यामार्फत दापका भवानी येथे स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री राजूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक श्री पांचाळ सर, NSS कार्यक्रम अधिकारी श्री कादरी जे एम, शिल्प निदेशक श्री सूर्यवंशी सर, श्री गायकवाड सर, थोरात सर, ढाले सर व सर्व स्वयंसेविका व स्वयंसेवक उपस्थित होते.
