पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती साजरी
निलंगा :- दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती शहीद श्रीधर चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा येथे साजरी करण्यात आली, या प्रसंगी प्रमुख वक्ते मा. श्री. परमेश्वर जी हासबे ( माजी सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) पंडित दीनदयाल एकात्मता मानव दर्शन ह्या विषयावर व्याख्यान दिले, तसेच मा.श्री नरसिंग झरे ( सचिव भटक्या विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य) व मा. श्री. दत्तात्रेयजी पांढरे ( आय एम सी सदस्य आयटीआय निलंगा )यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले, संस्थेचे प्राचार्य मा. श्री. हर्षद राजुरकर साहेब, गटनिदेशक श्री पांचाळ सर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री कादरी सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय लातूर व राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा यांच्यामार्फत संस्थेत रक्तदान शिबिर पार पडले, संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री. हर्षद राजूरकर साहेब यांनी 61 वी वेळी रक्तदान केले, त्यांच्या प्रेरणेतून श्री. थोरात सर, कुलट सर, दडपे सर, कलाने सर, व प्रशिक्षणार्थ्यांनी रक्तदान केले,
