लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. मागील २४ तासांत लातूर जिल्ह्यात ७५.३ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी तब्बल ३७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद अहमदपूर तालुक्यात झाली आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील शंभर वर्षांत झाला नाही असा पाऊस लातूरमध्ये झाला आहे. रात्री लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्यामुळे आज जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती.
जिल्ह्यातील तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
लातूर तालुका ५९ मिलिमीटर, औसा तालुका ५४.८ मिलिमीटर, अहमदपूर तालुका १३७ मिलिमीटर, निलंगा तालुका ५३.७ मिलिमीटर, उदगीर तालुका ९९.१ मिलिमीटर, चाकूर तालुका ९४.८ मिलिमीटर रेणापूर तालुका ६२.६ मिलिमीटर, देवणी तालुका ५७.७ मिलिमीटर, शिरूर अनंतपाळ तालुका ६१.३ मिलिमीटर, जळकोट तालुका ७७.६ मिलिमीटर सरासरी पाऊस झालेला आहे.
लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी तब्बल ३७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात नोंदवला गेला असून अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर महसूल मंडळात १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
