पावसाचा हाहाकार; जिल्हाधिकारी पुजार, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल
सांस्कृतिक महोत्सवातील व्हायरल व्हिडिओने संतापाची लाट, टीकेची झोड
गाण्यावर पूरग्रस्त धाराशिवचे जिल्हाधिकारी, आरडीसी थिरकले
धाराशिव (मोईज सितारी): –मराठवाड्यासह राज्याचा बहुतांश भाग ओल्या दुष्काळी तडाख्याने गारठलेला असताना चक्क जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ‘बाईला सोसना डोंगराची हवा…’ गाण्यावर ठेका धरून नाचकाम केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने खळबळ माजली आहे. तुळजापूर (जि. धाराशिव) येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्तआयोजित सांस्कृतिक महोत्सवात हा असंवेदनशील प्रकार बाहेर आल्याने राज्यभर टीकेची झोड उठली आहे. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांशी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी यासारख्या अभूतपूर्व पावसाच्या तडाख्याने शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागासहशहरांचीवाताहत झाली आहे. खरीप पूर्णतः नष्ट घास हिरावला गेला आहे. या झाला आहे. हातातोंडाशी आलेला आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत पेक्षा अधिक व्यक्तींचे बळी गेले १५ आहेत. हजारो पशुधन दगावले आहे. लाखो
घरांची पडझड झाली आहे. दस्तुरखुद्द शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदारांसह शासन, प्रशासन मागील आठवडाभरापासून पूरग्रस्त भागाचे दौरे करून नुकसानग्रस्तांना धीर देण्याचे काम करीत आहे. अशातच तुळजापूर (जि. धाराशिव) येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी ‘गार डोंगराची हवा अन् बाईला सोसना गारवा…’ या भन्नाट गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री ८ ते १० च्या दरम्यान सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव यांचा लोकसंगीत मैफलीचा कार्यक्रम होता. कलाकार अभिजीत जाधव यांच्या ‘बाईला सोसना गारवा…’ या गाण्यावर जिल्हाधिकारी पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या डान्सचा व्हिडीओ समाजमाध्यमावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. संपूर्ण राज्य ओल्या दुष्काळाच्या तडाख्यात लपेटलेले असताना जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ जबाबदार अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांची रात्री उशिरापर्यंत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.
मुख्यमंत्री कारवाई करतील – पालकमंत्री
जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कृत्य निंदनीय आहे. मुख्यमंत्री असंवेदनशील अधिकाऱ्यावर निश्चित कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवजिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शिस्तभंगाची कारवाई करा – वडेट्टीवार
शेतकरी, पूरग्रस्त नागरिक संकटात असताना जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नाचगाणी करणे हा असंवेदनशीलपणा आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा सरकारचाच नंगानाच अशा शब्दात या प्रकरणावर टीका केली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोट्यवधींचा खर्च तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवावर ५ ते ६ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. गायक, वादक, कलाकारांना लाखो रुपये मानधन देण्यात येणार आहे. हा कोट्यवधी रुपयांचा खर्च रद्द करून हीरक्कम पूरग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पशुधन दगावलेल्या पशुपालकांना देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
आयुक्तांना चौकशीचे आदेश
विभागीय आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे राज्याचे महसूल व वनमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
