• Thu. Oct 16th, 2025

उदगीर शहरातील गुन्हे करणारे टोळीला चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश

Byjantaadmin

Sep 27, 2025

उदगीर शहरातील शरीराविषयी गुन्हे करणारे टोळीला चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत  पोलीस अधीक्षकांचे आदेश

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी टोळीने गंभीर गुन्हे करणारे इसमांना लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी या चार जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्याबाबतचे आदेश काढलेले आहेत. उदगीर शहरातील इसम नामे 

1) सुमेर कलीम तांबोळी वय 28 रा. मुसा नगर उदगीर  2) समीर कलीम तांबोळी वय 32 रा. मुसा नगर उदगीर  3) सिकंदर अजगर शेख रा. मुसा नगर उदगीर  4) असद खान शरीफ खान पठाणे रा. मुसा नगर उदगीर

  वरील इसम हे गटातील साथीदाराचे मदतीने शरीराविषयी गंभीर गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक शांततेवर होत असल्याने व सदर इसमांची सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली असल्याने . सदर इसमां विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असल्याने सदर इसमांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनाखाली उदगीर शहर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दिलीप गाडे  यांनी पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव पाठवला होता. 

 त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी टोळीने गंभीर गुन्हे करणारे इसमांना लातूर,नांदेड, धाराशिव, परभणी या चार जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. आदेशानुसार उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि श्री रवींद्र तारू व पोलिस अंमलदार सतीश पवार गजलवार  यांनी 1) सुमेर कलीम तांबोळी वय 28 रा. मुसा नगर उदगीर  2) समीर कलीम तांबोळी वय 32 रा. मुसा नगर उदगीर  3) सिकंदर अजगर शेख रा. मुसा नगर उदगीर यांना दिनांक 25/9/2025 रोजी जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडलेले आहे व उर्वरित एक आरोपीस नोटीस बजावण्यात आलेली आहे. वरील नमूद इसम हे परत लातूर परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात आढळून आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.  भविष्यात सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारे व दहशत निर्माण करणारे व शरीराविषयी गुन्हे करणारे इसमाचे बाबतीत अशाच प्रकारची निरंतर कारवाई सुरू राहणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *