• Thu. Oct 16th, 2025

मारुती महाराज साखर कारखाना येणाऱ्या हंगामात उसाला  3011 रुपये भाव देणार-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Sep 27, 2025

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मांजरा परिवार सदैव विकासाचे काम करणार

मारुती महाराज साखर कारखाना येणाऱ्या हंगामात उसाला  3011 रुपये भाव देणार-माजी मंत्री दिलीपराव देशमुख संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीला अखेर मारुती महाराज साखर धावला

लातूर;-जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने सभासदांनी बिनविरोध निवडून दिलेले असून लोकांनी दिलेले आशिर्वाद व त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे आम्ही फक्त विश्वस्त म्हणून काटकसर करून योग्य भाव देण्याचा प्रयत्न करीत असून मारुती महाराज साखर कारखाना  एक दिवस मांजरा साखर कारखान्याबरोबर दर देईल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी व्यक्त करून आगामी ऊस गाळप हंगामात मारुती महाराज साखर कारखाना उस  गाळप शेतकऱ्यांना 3011रूपये  विक्रमी भाव देण्याची घोषणा केली दरम्यान या विक्रमी भावाचे सर्वसाधारण सभेत सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले तर आगामी काळात शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ते शुक्रवारी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा औसा येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकजी काळे,मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील माजी चेअरमन गणपत बाजूळगे, राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, ट्वेन्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख,रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ स्वयप्रभा पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, कार्यकारी संचालक सदाशिव बहिर, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, मांजराचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, रेणा चे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे,जागृती चे सरव्यवस्थापक गणेश येवले, जागृती शुगर चे स्वीकृत संचालक बालाजी बिरादार, मांजरा साखर कारखान्याचे संचालक सदाशिव कदम,संचालक  दयानंद बिडवे, बालाजी पांढरे,

 क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, प्रवक्ते राजेंद्र मोरे,अजित मुसांडे,मीडिया समन्वयक हरिराम कुलकर्णी, संभाजीराव सुळ सुभाष मुक्ता, कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, शामराव साळुंके अँड बाबासाहेब गायकवाड, संतोष भोसले अनिल पाटील, गोविंद सोनटक्के, विलास काळे,रमेश वळके, भरत माळी, चंद्रसेन पाटील शिवाजी बिराजदार उपस्थित होते 

साखर कारखाने नव्या युगाचे मंदिर-माजी मंत्री दिलीपराव देशमुख* 

लातूर जिल्हा हा समृध्दी असलेला आगळावेगळा जिल्हा आहे या साखर कारखान्यात सर्वपक्षीय लोकांचें संचालक मंडळ असून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून या साखर कारखान्यास स्थानीक आमदार अभिमन्यू पवार यांनी ही सहकार्य केल्याचे सांगून भविष्यात  साखर कारखाने ही विकास घडवण्यासाठी नव्या युगाचे मंदिर बनली आहेत असे सांगून या साखर कारखान्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले भविष्यात शेतकऱ्यांच्या मदतीला सात मजली बँक आपल्या मदतीला धावेल असा विश्वास व्यक्त केला 

मांजरा परिवार शेतकऱ्यांच्या हिताच्या पाठीमागे-जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांचे प्रतिपादन

राज्यात ट्रीपल सरकारचे इंजिन असून देशात त्यांचं सरकार असून मराठवाड्यात ७ जिल्ह्यात ७५ टक्के शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या ट्रिपल सरकारने मोठ्य प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत एकीकडे छोटंसं पंजाब राज्य शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देत आहे याकडे लक्ष देवून राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पंजाब सरकारांच्या धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कर्ज योजना राबवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत यापुढेही शेतकऱ्यांना जिल्हा बँक सदैव तत्पर सेवा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले तसेच तालुक्यातील विविध गावातून नवीन शाखा उघडण्याची मागणी आमच्याकडे येत आहे तसा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवला असून त्यानंतर या तालुक्यात नवीन शाखा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव मांजरा परिवार आपल्या कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असा विश्वास व्यक्त केला  यावेळी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलन केले सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूर उपस्थित सभासदांनी दिली कार्यक्रमांचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गणपत बाजुळगे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *