महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यास सरसकट मदत करा, जिजाऊ ब्रिगेडची मागणी
लातूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने शेतीचे अतिशय नुकसान केले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे ,शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा ,अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
आगामी सणासुदीच्या काळात शेतकरी राजाला मदत म्हणून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ,अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी मा. संगीता टकले मॅडम यांना निवेदनातून करण्यात आली आहे ,यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा, अर्चना पाटील, प्रदेश सदस्य रंजना हासुरे ,कोषाध्यक्ष मीरा देशमुख ,उपाध्यक्ष अनिता मुद्गुले, जयश्री हांडे जयश्री सावंत इत्यादी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या.
