आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा ; बंजारा समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आक्रमक
निलंगा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता बंजारा समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात होता. त्यामुळे मराठा समाजाला हे गॅझेट लागू होत असेल तर ते बंजारा समाजालाही लागू झाले पाहिजे व अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी निलंग्यात बंजारा लमान समाजाच्या वतीने गुरुवारी (दि २५) निलंगा येथील जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढून प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनस्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी भेट देऊन पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केली. मोर्चात विजय चव्हाण, अशोक चव्हाण, संतोष पवार, दयानंद राठोड, बालाजी राठोड, सतीश चव्हाण, वसंत राठोड, आकाश राठोड, वाल्मीक चव्हाण, धोंडीराम पवार, प्रकाश चव्हाण, अर्जुन जाधव, सुनील राठोड, अनिल राठोड, मारुती राठोड, आकाश राठोड, धोंडीराम पवार, वसंत राठोड, वाल्मीक चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनिल राठोड आदी उपस्थित होते.
