विलास सहकारी साखर कारखान्याची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा; २९ सप्टेंबर रोजी लातूर येथे
लातूर प्रतिनिधी, शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५:
सहकार आणि साखर उद्योगामध्ये पथदर्शी ठरलेल्या विलास सहकारी साखर कारखाना
लि.,ची सन २०२४-२५ या वर्षाची अधिमंडळाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २९
सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली
विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा दुपारी १ वाजता संपन्न होईल.
विलास सहकारी साखर कारखाना ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी यांच्या
आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सभेच्या स्थळात बदल
करण्यात आला असून, ही सभा लातूर येथील हॉटेल वैष्णव, बँक्वेट हॉल, साई नाका, डीमार्ट
रिंगरोड, लातूर येथे होणार आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि विशेष प्रशिक्षण
या वार्षिक सर्वसाधारण सभेस कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव
देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार कैलास
घाडगे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे.
या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासद शेतकऱ्यांसाठी सकाळी १० ते १
वाजता सभेच्या स्थळी कृषिरत्न डॉ. संजीव माने यांचे ऊस लागवड तंत्रज्ञान व खोडवा
व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच ऊसरोप लागवड यावर विशेष
मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक
आबासाहेब पाटील यांनी अधिमंडळाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांना
सभेसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
विलास कारखान्याच्या वार्षिक सभेचे स्थळ बदलले;
अतिवृष्टीमुळे हॉटेल वैष्णव येथे आयोजन
विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी, ता. जि. लातूर यांच्या सर्व
सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची सन २०२४-२५ या वर्षाची ‘अधिमंडळाची वार्षिक
सर्वसाधारण सभा’ ही सध्या सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे नियोजित ठिकाणी
होऊ शकत नाही. त्यामुळे सभेच्या स्थळामध्ये बदल करण्यात येत आहे. सभेची तारीख आणि
वेळ कायम राहील, मात्र स्थळामध्ये बदल झाला आहे. नवे स्थळ : हॉटेल वैष्णव,
बँक्वेटस् हॉल, साई नाका, ‘डी’ मार्ट रोड, लातूर येथे होणार आहे.
