• Fri. Oct 17th, 2025

घरफोडीच्या गुन्ह्यातील 02 आरोपीना 06 लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक..

Byjantaadmin

Sep 24, 2025

घरफोडीच्या गुन्ह्यातील 02 आरोपीना 06 लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक.. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

        लातूर :- याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीमध्ये बंद घरचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होत्या. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता  .
          पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
         सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला बंद घराचे कडीकोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 23 सप्टेंबर रोजी पथकाने  स्वराज्य नगर परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 

1) मतिन याकुब सय्यद, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, लातूर.

2) अभिषक सुहास यादव, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पांखरसांगवी.लातूर

           असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ त्यांनी चोरी केलेले सोन्याचे 103.17 ग्राम वजनाचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी असा एकूण 06 लाख 38 हजार 811 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आले. सदरचा मुद्देमाल नमूद आरोपींनी त्यांच्या आणखीन दोन साथीदारासह मिळून पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधील 12 नंबर पाटी परिसरातील बंद घराचे कडी कोंडे तोडून चोरी केल्याचे नमूद आरोपींनी कबूल केले आहेत. आरोपींना त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे , सपोउपनि सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार अर्जुन रजपुत, रामलिंग शिंदे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, गणेश साठे, शैलेश सुडे, चंद्रकांत केंद्रे, खांडेकर, चोपणे, महिला पोलिस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *