• Tue. Apr 29th, 2025

मुस्लिम आरक्षण साठी उदगीरात आंदोलन

Byjantaadmin

Dec 26, 2022

मुस्लिम आरक्षण साठी उदगीरात आंदोलन

उदगीर:मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती च्या वतीने
गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज सामाजीक ,राजकीय,आर्थिक शैक्षणिक,औद्योगिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे शासकीय समित्या रंगनाथ कमीशन,सच्चर कमीशन, डॉ.महेमदुर्रहमान कमीशन यांच्या अहवालाने स्पष्ट होत आहे,म्हणुन संपूर्ण राज्यात मुस्लिम आरक्षण, शिक्षण,संरक्षणाची मागणी समाज करीत आहे,लोकशाही पद्धतीने वेळोवेळी आंदोलन करुण आपली भूमिका या समाजाने शासन दरबारी व्यक्त केलि आहे,मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचे माननिय उच्च न्यायालयाने आदेशित करुण देखील या बाबत शासन गंभीर नाही,म्हणून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुस्लिम आरक्षण मिळालच पाहिजे या मागणीसाठी शासनाचे राज्य हिवाळी अधिवेशन सुरु आहे.
या अनुषंगाने राज्यभरात मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे
म्हणुन आज रोजी उदगीर जिल्हा लातूर येथे मुस्लिम आरक्षणाच्या मागणी साठी निदर्शने आंदोलन करण्यात आले याची दखल राज्य शासनाने गंभीरृत्या घ्यावी अन्यथा हे आंदोलन तीवृ करण्यात येईल.असा निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

या वेळी निवेदन देताना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती चे शेख इरफान,शेख समीर, पठाण मुसा, शेख मुंतजीब,पठान खाजा खिजर मुन्शी,अजमार शेख,शेख मोहियॉद्दीन, सम्यद वाजीद,सयद असलम,मिर्जा अफान,शेख़ अल्ताफ़ हुसैन, रामजी संभा,बासाहेब र्यवंशी,शेख ईब्राहिम, शमशु जरगर,
अहमद सवर,नाईक सुधावार,शेख अशफाक,बस्वेश्वर डावळे सह राजकीय पक्ष चे व सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed