मरणाच्या दाढेतून रूग्णाला वाचवले लाला पटेकडून डाॕक्टरचा सत्कार
निलंगा:-शिवाजी माणिकराव जगताप रा. दापका ता. निलंगा भागातील रहिवासी असून त्यांना सोमवारी रात्री अचानक सौम्य ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे सर्वच घरातील घाबरून गेले. नातेवाईकानी लागलीच सरपंच लाला पटेल यांच्याशी संपर्क साधला लाला पटेल व बबलू जाधव यांनी तत्काळ डॉ .समीर पाटील तळीखेड़कर यांच्या दवाखाना घेऊन आले. डाॕक्टरनी लागलीच अॕडमीट केले असता डॉ .तळीखेडकर यांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले .
तात्काळ दखल घेऊन डॉक्टर यांनी उपचार केल्याने रुगणाचा जीव वाचला यामुळे डॉ .तळीखेड़कर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दापका ग्राम पंचायतचे लाला पटेल ,बबलू जाधव, अश्विन रागों अप्पा, शकील पटेल, हाणमंत गोरे,अलीम शेख ,खुर्शीद शेख, उमेश शिरूरे, वीरा मेडिकलचे नागेश टोम्पे, सह अनेक जण उपस्थित होते
हा रूग्ण अन्य दवाखाना किंवा लातूर येथे गेला असता तर दोन ते अडीच लाख खर्च झाले असते डाॕक्टर तळीखेडकर यांनी प्रयत्न करून त्या गारिब रूग्णाचे प्राण वाचवले. व आर्थिक पार्श्वभूमीवर विचार करून अत्यंत माफक दरात उपचार केला.