प्रा डॉ. तरंगे सरांचे श्री कोचिंग क्लासेस, निलंगा-लातूर विविध पुरस्काराने सन्मानित
निलंगा:- निलंगा जिल्हा-लातूर येथील प्रा. डॉ. तरंगे सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा विविध संस्थांमार्फत सन्मान करण्यात आला.प्रा. डॉ . गजेंद्र तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेस निलंगा-लातूर ला महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड 2025 द्वारे Outstanding Contribution to online education in Maharashtra या पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
Ajinkya D.Y.Patil University द्वारे Coaching Class Excellence Award 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच भारत न्यूज नेटवर्क द्वारे भारत सन्मान अवॉर्ड 2025 ने गौरव करण्यात आला.मागील 25-वर्षांपासून प्रा .डॉ. गजेंद्र तरंगे सरांनी श्री कोचिंग क्लासेस निलंगा-लातूर च्या माध्यमातून हजारो विध्यार्थ्यांना शिक्षण देऊन उच्च पदापर्यंत पोहचवले आहेत. कोरोना काळापासून त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
आजही ऑनलाईन क्लासद्वारे संपूर्ण 36-जिल्ह्यामध्ये 3 री ते 12 वी तसेच एमपीएससी, सरळसेवा, तलाठी, पोलीस, आरोग्य भरती व TET (शिक्षक पात्रता परीक्षा) चे वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सरांचे अँप द्वारे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.प्रत्येक गावापर्यंत, वाडी-वस्ती, तांड्यापर्यंत सरांनी अगदी माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच 100 पेक्षा जास्त युवकांना सरांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा एकमेव उद्देश ठेवून प्रा डॉ.गजेंद्र तरंगे सरांचे शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र कार्य सुरू आहे.

