• Thu. Feb 5th, 2026

नितीन गडकरी–देवेंद्र फडणवीस यांच्या यशासाठी मागितलेली मन्नत पूर्ण करण्यासाठी प्यारे खान अजमेरला

Byjantaadmin

Sep 23, 2025

नितीन गडकरी–देवेंद्र फडणवीस यांच्या यशासाठी मागितलेली मन्नत पूर्ण करण्यासाठी प्यारे खान अजमेरला

महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी १५० जायरीनसोबत दरगाह शरीफ येथे अर्पण केली चादरदेश व राज्याच्या अमन-शांततेसाठी केली विशेष दुआ

 नागपूर :–(मोईज सितारी)हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) श्री. प्यारे जिया खान यांनी शुक्रवारी अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरगाहवर हजेरी लावून चादर अर्पण केली. या वेळी देशात व राज्यात अमन-शांतता आणि सुख-समृद्धी राहावी, अशी विशेष दुआ त्यांनी मागितली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान प्यारे खान यांनी मन्नत मागितली होती की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीत विजयी व्हावेत आणि विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. ही दोन्ही मन्नत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दरगाह शरीफ येथे चादर अर्पण करून आपली नवस फेडली.शुक्रवारी नागपूरहून स्टार एअरवेजच्या नागपूर–किशनगढ फ्लाइटने प्यारे खान अजमेरला पोहोचले. त्यांच्यासोबत सुमारे १५० जायरीन दरगाह शरीफ येथे दाखल झाले. सर्व श्रद्धाळूंनी सूफी संतांची जियारत करून चादर अर्पण केली.

या प्रसंगी सलीम सोफी, शारिक पटेल, मौलाना गुफरान, मोहम्मद अली, सरफराज खान, एजाज खान, फैसल शेख, अशरफ खान, सूफियान खान, अशरफ वानकर, अतीक अन्सारी, ग्यासुद्दीन अशरफ, इब्राहिम शेख, इरफान खान, राशिद खान, सज्जाद अली, पत्रकार सालार शेख, सलीम अजानी, सैयद रऊफ, ताज अहमद राजा, हाजी फारुक बावला, इमरान ताजी, मुस्तफाभाई टोपीवाला, वसीम खान यांच्यासह अनेक श्रद्धाळू व प्यारे खान मित्रपरिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *