महानगरपालिके मार्फत स्वच्छता हि सेवा पंधरवाडा अंतर्गत प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली
लातूर/ प्रतिनिधी: लातूर महानगरपालिके मार्फत शासनाच्या आदेशाप्रमाणे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता हि सेवा पंधरवाडा आयोजित करणेबाबत आदेशित केले असून आज दिनांक: २२/०९/२०२५ रोजी गांधी चौक,गांधी मार्केट सुभाष चौक ते हत्ते नगर प्लास्टिक बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिक वापरू नये असे आवाहन करून जनजागृती करण्यात आली ,सदर रॅलीस मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी हिरवाझेंडा दाखवुन मार्गस्थ केले.
भारतामध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी असून पर्यावरणास मोठ्या प्रमाणात अश्या प्लास्टिक मुळे हानी होत आहे,लातूर शहरामध्ये एकल वापर प्लास्टिक,जवळ बाळगणे,निर्मिती, साठा दंडनीय असून याबाबत जनजागृती होने आवश्यक आहे ,म्हणून स्वच्छता ही सेवा पंधरवाड्यात विशेषतः गांधी चौक ते गंज गोलाई परिसर बाजार पेठ परिसरात याचे जनजागृती करण्यात आले
यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे,मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, धोंडिबा सोनावणे, अक्रम शेख , शिवराज शिंदे, सर्व स्वच्छता निरीक्षक, गणेश विद्यालय,व्यंकटेश विद्यालय,शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होते.

