• Thu. Feb 5th, 2026

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी लातूर काँग्रेसचा मदत कक्ष कार्यान्वित महसूल मंडळ निहाय टास्क फोर्सची स्थापना

Byjantaadmin

Sep 22, 2025

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी लातूर काँग्रेसचा मदत कक्ष कार्यान्वितमहसूल मंडळनिहाय टास्क फोर्सची स्थापना

लातूर प्रतिनिधी:
गेल्या एक महिन्यापासून लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत आणि जनजीवनात
मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळवून
देण्यासाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख
यांच्या सूचनेनुसार, काँग्रेस भवनात एका विशेष ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. या वॉर
रूमच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार,
या ‘अतिवृष्टी नियंत्रण व मदत कक्ष’ची जबाबदारी ह.भ.प. शरद देशमुख, सचिन सूर्यवंशी, डॉ. सतीश
कानडे आणि बालाजी वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नेतृत्वाखालील पथक
जिल्ह्याभरात युद्धपातळीवर काम करेल.

राज्यातील पहिलाच प्रयोग:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवेदन देणे किंवा आंदोलन करणे अशा पारंपारिक
पद्धतींना फाटा देत, लातूर जिल्हा काँग्रेसने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. आमदार अमित
देशमुख यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांसाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले
आहेत. हे निरीक्षक आपापल्या भागातील गावांना भेटी देऊन शेती आणि इतर नुकसानीची वस्तुनिष्ठ
माहिती संकलित करतील. हा राजकीय पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा
महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.लातूर जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळात
नियुक्त करण्यात आलेल्या निरिक्षकांची नावे तालुका निहाय पुढीलप्रमाणे आहेत. लातूर तालुका:
लातूर – धनंजय देशमुख (पप्पू), कन्हेरी – रमेश थोरमोटे पाटील, गातेगाव – रविंद्र काळे, मुरुड – डॉ.
दिनेश नवगीरे, कासारखेडा – विजय देशमुख, चिंचोली (बु) – धनंजय (तात्या) देशमुख, तांदुळजा –
मदन भिसे, बाभळगाव – माधव गंभीरे,हरंगुळ (बु) – भिमा झुंजारे, औसा तालुका :औसा – सचिन
पाटील, किनी थोर – पांडुरंग चेवले, किल्लारी – किरण बाभळसुरे, भादा – सतिश शिंदे, मातोळा – शाम
भोसले, बेलकुंड – दत्तोपंत सुर्यवंशी, उजनी – नारायण लोखंडे, लामजना – बाळासाहेब सांगवे, रेणापूर
तालुका: रेणापूर – अनंतराव देशमुख, कुंभारवाडी – शेषेराव डाके, पोहरेगाव – सर्जेराव मोरे, पळशी –

अनिल पवार, कारेपूर – उमाकांत खलंग्रे, पानगाव – चंद्रचूड चव्हाण उदगीर तालुका: उदगीर – श्रीकांत
पाटील, नागलगाव – संजय पवार, नळगीर – ॲड. पद‌माकर उगीले, देवर्जन – विवेक जाधव, हेर – नाना
ढगे, तोंडार – संदीप पाटील, वाढवणा बु – माधव कांबळे, मोघा – रामेश्वर बिरादार, जळकोट तालुका:
जळकोट – विश्वनाथ इंद्राने, घोणसी – आशिष पाटील, अहमदपुर तालुका:अहमदपुर – विकास
महाजन, माळेगाव खु – बालाजी देवकते, किनगांव – शहाजी साखरे, खंडाळी – मारोती माने, शिरूर
ताजबंद – सिराजुद्दीन जहागीरदार, हाडोळती – संजय पवार, अंधोरी – भाग्यश्री क्षीरसागर चाकूर
तालुका: चाकूर – विलास पाटील, वडवळ ना. – पिंटू पाटील महळांगीकर, शेळगाव – सुरेश मुंडे झरी बु –
ॲड. कोटे, नळेगाव – अनिल चव्हाण, आष्टा – अनिल चव्हाण, निलंगा तालुका: निलंगा – हमिद शेख,
अंबुलगा बु. – पंकज शेळके, हलगरा – आंबादास जाधव, औराद (शहा.) – ॲड. संदीप मोरे, कासारशिरसी

  • निलेश चिंचनसुरे, कासारबालकुंदा – रणजीत कोकणे, पानचिंचोली – श्रीकांत साळुंके, निटूर – गंगाधर
    चव्हाण, मदनसुरी – अजित माने, भुतमुगळी – किशोर टोंपे, अशोक सुर्यवंशी, शिरूर अनंतपाळ
    तालुका: शिरूर अनंतपाळ – रामकिशन गड्डीमे हिसामाबाद – डॉ. अरविंद भातांब्रे, साकोळ – प्रभाकर
    बंडगर, देवणी तालुका: देवणी बु. – वैजनाथ लुल्ले बोरोळ – अजित बेळकोणे, वलांडी – दिलीप पाटील
    यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माहिती संकलन आणि प्रशासकीय समन्वय:

नियुक्त केलेले निरीक्षक प्रत्येक गावातील नुकसानीची सविस्तर माहिती गोळा करून ती ‘वॉर
रूम’कडे जमा करतील. त्यानंतर, संकलित माहितीचा अहवाल स्वतः आमदार अमित देशमुख,
जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव आणि इतर नेते जिल्ह्याचे
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना सादर करतील. ही ‘वॉर रूम’ केवळ माहिती गोळा करण्यापुरती
मर्यादित नसून, ती प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांना थेट मदत मिळवून देणार आहे.
तसेच, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले जाईल.
या उपक्रमाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले, “सध्याची परिस्थिती अत्यंत
गंभीर आहे. अशा वेळी केवळ सहानुभूती दाखवून चालणार नाही. लोकांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल,
यासाठी काँग्रेस पक्ष प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करेल. ही ‘वॉर रूम’ त्याच दिशेने
टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.” त्यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची
माहिती निरीक्षकांना देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *