• Thu. Feb 5th, 2026

तळीखेड येथील शेकडो एकर ऊस पिक भुईसपाट

Byjantaadmin

Sep 21, 2025

तळीखेड येथील शेकडो एकर ऊस पिक भुईसपाट.

तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तळीखेड येथील शेतकरी बांधवांची मागणी.

निलंगा ;- तालुक्यातील तळीखेड येथील शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने कहर केला असून तळीखेड परिसरातील शेकडो एकर ऊस संपूर्ण भुईसपाट झाला असल्याने येथील शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात झाले असून.मा. तहसीलदार साहेब निलंगा व उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी तात्काळ या परिसरातील ढगफुटी पावसामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून उसासोबत संपूर्ण सोयाबीन, तुर, उडीद,मुग हेही पीक हातातून गेली आहेत.

शेतकरी बांधव उसाच्या पिकावर आपल्या कुटुंबाला तसेच इतर काही देवाणघेवाण करून आपला उदरनिर्वाह भागवण्याचे काम करत असतो मात्र कालच्या झालेल्या अति मुसळधार पावसाने संपूर्ण उसाचे क्षेत्र भुई सपाट झाल्यामुळे येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संकटात सापडला असून त्यांना आता खूप मदतीची गरज आहे.

तेरी मेहरबान तहसीलदार साहेब व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी येथील शेतकरी बांधव श्री मोहन पांचाळ व विश्वनाथ वारद यांनी येथील अधिकाऱ्यांना विनंती करून मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *