• Thu. Feb 5th, 2026

निलंगा परिसरात विजांचा कडकडाट, एका महिलेसह चार जनावरे दगावली

Byjantaadmin

Sep 21, 2025

निलंगा परिसरात विजांचा कडकडाट, एका महिलेसह चार जनावरे दगावली

……..

निलंगा पासून जवळच असलेल्या मौजे सांगवी-जेवरी ता. निलंगा येथे शनिवारी ता. 20 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह खूप मोठा पाऊस झाला. सांगवी ते दोन ठिकाणी वीज पडून एक महिला व चार जनावरांचा जागीचा मृत्यू झाला. यामध्ये सांगवी पूर्व येथील घराच्या पाठीमागे असलेली म्हैस पावसामुळे घरात आणण्यासाठी अनिता मारुती राठोडे वय 40 वर्षे ही महिला गेली असता तिच्या अंगावर वीज पडून ती  दगावली. सोबत म्हैस व त्यांचा पाळीव कुत्रा ही दगावला. याच शिवारात तेरणा नदीच्या बाजूला असलेल्या महादेव भानुदास सरतापे या शेतकऱ्यांची बैलजोडी विज पडून दगावली आहे. घटनास्थळी निलंगा तहसिलचे तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यानी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पहाणी केली आहे. तसेच पोलिसांनीही घटनेचा पंचनामा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *