काटेजवळग्याच्या ओढ्याच्या पूरात दोघे वाहून गेले एक बचावला,तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला
निलंगा तालुक्यात पावसाचा पून्हा कहर
निलंगा

शेताकडे गाय घेऊन जाताना काटेजवळगा तालुका निलंगा येथील ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात दोघे वाहून गेल्याची घटना रविवारी ता. २१ रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली यामध्ये एकजण बचावला तर एक जन बेपत्ता होता. बेपत्ता शेतकऱ्यांना शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले होते. निलंगा तालुक्यात पावसाने झोडपले असून पावसाचा कहर झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की रात्री तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आला असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे तालुक्यातील पानचिंचोली,लाबोंटा, काटेजवळगा यासह अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे तर काही ठिकाणी घराची पडझड झाली आहे. काटेजवळगा तालुका निलंगा येथील वैजनाथ श्रीपती राजमाने वय ५० व दयानंद संभाजी बोयणे ४५ हे दोघे शेताकडे सकाळी गाय घेऊन जात असताना रेड्डी यांच्या शेताजवळील वड्याला मोठा पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे रस्ता पूर्ण करत असताना दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये दयानंद बोयणे हे बालबाल बचावले तर वैजनाथ राजमाने हे सकाळपासून बेपत्ता होते अखेर त्याचं मृतदेह सापडला..गावातील मुक्कामी असणारी बस गाडी बंद होती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिक या वड्याच्या ठिकाणी जमा झाले होते परंतु त्यांच पत्ता लागत नव्हता दोघांपैकी एकाचे प्राण वाचले असून वैजनाथ श्रीपती राजमाने यांना शोधा शोध करून अखेर मृतदेह सापडलं आहे याबाबत एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते त्यामुळे हे पथक बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचून खरिप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे त्यामुळे या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात झालेला पाऊस
निलंगा – ३६ मी. मी. , पानचिंचोली-३, निटूर ५५, औरादशहाजानी ५०, कासारबालकुंदा ५२, अंबुलगा २७, कासारशिरसी ३८, मदनसुरी ४४, हलगरा १४, भुतमुगळी ३८ या दहा महसूल मंडळात झालेली पावसांची नोंद
