• Thu. Feb 5th, 2026

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांच्या हस्ते शिवसेना संलग्न राष्ट्रीय कर्मचारी सेना औसा आगार युनियच्या नामफलकाचे अनावरण

Byjantaadmin

Sep 21, 2025

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांच्या हस्ते शिवसेना संलग्न राष्ट्रीय कर्मचारी सेना औसा आगार युनियच्या नामफलकाचे अनावरण

औसा:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या शिवसेना विचारांनी प्रेरित राज्याचे  उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे  आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना केंद्रीय अध्यक्ष श्री किरणजी पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव माने  यांच्या शुभहस्ते शिवसेना संलग्न राष्ट्रीय कर्मचारी सेना औसा आगार युनियनच्या संघटना बोर्डाचे अनावरण पुष्पहार घालून करण्यात आले.

सदर कार्यक्रमास औसा शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे  राष्ट्रीय कर्मचारी सेना राज्यचिटणीस श्री व्यंकटराव बिरादार विभागीय अध्यक्ष श्री सतीश राव पवार विभागीय सचिव श्री हर्षद केंद्रे, निलंगा आगार सचिव श्री संतोष भिंगोले श्री किरण पाटील, औसा राष्ट्रीय कर्मचारी सेना आगाराध्यक्ष श्री रमाकांत सगर औसा आगार सचिव श्री सचिन हवलदार औसा आगार कार्याध्यक्ष श्री बालाजी माळी,विद्यानंद टिंगरे, जाकीर रामपुरे , परवेज शेख, जीवन चव्हाण इत्यादी संघटना पदाधिकारी उपस्थित होते .

या नंतर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव माने  तालुकाप्रमुख श्री तानाजी सुरवसे , राष्ट्रीय कर्मचारी सेना राज्यचिटणीस श्री व्यंकटराव बिरादार  यांच्या सह औसा आगार प्रमुख श्री स्वामी यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री माने यांनी केला तसेच औसा आगार कार्यशाळा अधीक्षक श्री होळकर यांचा देखील सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन असणाऱ्या समस्या इतर अधिकारातील असणारे प्रश्न या संदर्भात आगारप्रमुख यांनी राष्ट्रीय कर्मचारी सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे जेणेकरून आगारातील प्रश्न मार्गी लागल्यानंतर सर्व कर्मचारी अत्यंत उत्साहाने काम करतील आणि आपल्या आगाराची लौकिकता वाढेल. होय आज औसा आगाराची पाहणी केली असता सुंदर अशी बसस्थानकाची व्यवस्था असून साफसफाई सुरक्षा या बाबीकडे आगार प्रमुख यांनी अत्यंत चांगले नियोजन केलेले दिसून आले. भविष्यात राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांचा दौरा झाला तर नक्कीच आपण औसा आगारास भेट देण्यासाठी विनंती करू आणि आपल्या केलेल्या सर्व कार्याची प्रशंसा होईल अशा पद्धतीचे नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया. नक्कीच भविष्य काळामध्ये कर्मचारी आगारप्रमुख बाकी अधिकारी या सर्वांच्या मेहनतीने आगार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशी नियोजन करून औसा आगार  एक नंबरला कसे राहील यासाठीच नियोजन करावे. याकरता आम्ही सुद्धा आपल्या सोबत राहू अशी ग्वाही जिल्हाप्रमुख शिवाजी  साहेब यांनी दिली . आगार प्रमुख औसा यांनी देखील राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. 

सदर परिचय तसेच संघटना बोर्ड अनावरण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री हर्षद केंद्रे विभाग सचिव यांनी केले तसेच श्री व्यंकटराव बिरादार साहेब यांनी कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त केले आणि आभार प्रदर्शन श्री सचिन हवालदार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *