• Thu. Feb 5th, 2026

निलंगा तालुक्यात “ओला दुष्काळ” जाहीर करावा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची मागणी!

Byjantaadmin

Sep 21, 2025

निलंगा तालुक्यात “ओला दुष्काळ” जाहीर करावा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची मागणी!

निलंगा:- उपविभागीय अधिकारी  उपविभागीय कार्यालय यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसानीबद्दल विविध मागण्या करण्यात आल्या.ओला दुष्काळ” तात्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे,प्रतिहेक्टर ₹ एक लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी,रद्द करण्यात आलेली एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरु करावी, तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी

अन्यथा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी दिला आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर राष्ट्रवादी चे आ.जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते  जयंत पाटील यांच्याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे याचा निषेध करत उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले गोपीचंद पडळकर यांना भाजपानी तात्काळ आवर घालावात्यांच्या आमदारकीवर कारवाई करून ती रद्द करावी भाजपातुन हकालपट्टी करावी.भाजपा पक्षाने आ.जयंत पाटील यांची जाहीर माफी मागावीअन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल व तीव्र आंदोलन करेल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सचिन राजनाळे युवक उपजिल्हाप्रमुख, तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे,अंगद जाधव,इफरोज शेख शहराध्यक्ष,निजाम शेख,मोरे संदीप,पंकज शिंदे ,युवक कार्याध्यक्ष सरतापे सागर कार्याध्यक्ष, रोहन कांबळे, ओम कोल्हे, सतीश कांबळे, मुश्ताक बागवान,लक्ष्मण क्षीरसागर,बालाजी जोडतल्ले,अकबर रईस, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कायेकर्ते निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *