• Thu. Feb 5th, 2026

अखेर चौथ्या दिवशी मनसेचे निलंग्यातील हरीजवळगा येथील उपोषण मागे

Byjantaadmin

Sep 21, 2025

अखेर चौथ्या दिवशी मनसेचे निलंग्यातील हरीजवळगा येथील उपोषण मागे

(मनसे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांची उपोषणस्थळी भेट)

निलंगा:- तालुक्यातील दहाही मंडळातील नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करा व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या या मागणी साठी चालू असलेले मनसे चे हरीजवळगा येथील उपोषण शासनाच्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्यांच्या तक्रारीअनुरूप पंचनामे करू अशा आश्वासनानंतर व मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या भेटीनंतर उपोषणकर्ते सचिन बिराजदार(तालुकाध्यक्ष मनसे निलंगा) यांना सरबत पाजून आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फक्त नदीकाठावरील शेती नुकसानीचे पंचनामे करा असा हास्यास्पद आदेश काढल्याने प्रशासन निलंगा तालुक्यातील दहा ऐवजी फक्त तीन मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे  करत होते.ह्या निर्दयी फतव्या विरुद्ध मनसेच्या सचिन बिराजदार यांनी हे उपोषण सुरू केले होते.सलग चार दिवसांपासून हे उपोषण केल्याने त्यांची शुगर कमी झाली असल्याकारणाने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.या उपोषणस्थळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने, शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ सोमवंशी,माजी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,प्रदीप शेळके,तालुकासचिव गणेश उसनाळे,तालुकाउपाध्यक्षविकास सूर्यवंशी,सोमलिंग पाटील,कृष्णा सुरवसे,शहराध्यक्ष अबू बकर,शेतकरी सेना तालुकाध्यक्ष सदाशिव हाडोळे,शिवराज चिंचोळे  आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ शेतकरी,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *